Maharashtra

खोलीत दोन हाणा पण बाहेर साहेब म्हणा ही त्यांची जुनी सवय आहे – निलेश राणे

By PCB Author

January 28, 2020

मुंबई, दि.२८ (पीसीबी) – शिवसेनेकडून लेखी आश्वासन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी काँग्रेसच्या सहभागासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मागितले होते, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. यावर बोलताना निलेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. निलेश राणे यांनी ट्वीटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला.

कोणीही शिवसेनेला टपली मारून जातं हल्ली. शिवसेना पक्ष लिहून चाटून सत्तेत आला ह्यात काही नवल नाही. शिवसेना चाटूगिरी करूनच सत्तेत आली हे जग जाहीर आहे. खोलीत दोन हाणा पण बाहेर साहेब म्हणा ही त्यांची जुनी सवय आहे. https://t.co/KdfUaeEQ2N

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 27, 2020