Maharashtra

खोपोलीत एसटी आणि टँकरचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू २० जखमी

By PCB Author

August 11, 2019

खोपोली, दि. ११ (पीसीबी) – पेण-खोपोली मार्गावर गागोदे फाटा येथे एसटी बस आणि गॅस वाहून नेणारा टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (रविवार) सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडली.

रघुनाथ म्हात्रे आणि दिनेश खेडेकर अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पावणेनऊच्या सुमारास एस टी बस खोपोलीहुन पेणकडे निघाली होती. त्याचवेळी समोरून येणारा गॅसवाहक टँकर अनियंत्रित झाला तो थेट एस टी बसला घासत जाऊन पुढे रस्त्यावर कलंडला. यात एस टी बसचा उजव्या बाजूचा पत्रा कापला गेला. यामध्ये रघुनाथ आणि दिनेश या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तब्बल २० जण गंभीर जखमी झाले. जखमींवर पेणच्या ग्रामीण रुग्णालयात तसेच अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .