Maharashtra

खेकड्यांपासून धोका; राज्यातील धरणाची होणार तपासणी

By PCB Author

July 13, 2019

मुंबई, दि, १३ (पीसीबी) – राज्याच्या जलसंपदा विभागाने अधीक्षक अभियंत्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील धरणांना खेकड्यांपासून धोका आहे का, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मातीच्या धरणांनाच खेकड्यांपासून धोका असतो, अशी चर्चा आहे. मात्र एका संशोधनात सर्वच प्रकारच्या धरणांना खेकड्यांपासून धोका निर्माण होऊ शकतो, असे म्हटले आहे. खेकडे मातीत बीळ करू शकतात, त्याच ताकदीने मुरुमही पोखरू शकतात अशी माहिती आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला तर त्यामध्ये काही जणांना आपला जिव सुद्धा गमावाव लागला. त्यानंतर जलसंपदामंत्री तान्हाजी सावंत यांनी अजब विधान केले होते, की धरण हे खेकड्यांमुळे फुटले होते. त्यानंतर त्यांच्यावर विरोधकाडून चांगलीच टिका करण्यात आली. तसेच सोशल मिडीयावर सुद्धा त्यांच्या विधानाची खिल्ली उडवण्यात आली होती.

दरम्यान, जलसंपदा विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील विविध ठिकाणच्या धरणांची चौकशी होणार आहे. तसेच ज्या धरणांना धोका आहे त्या धरणांची डागडुजीही करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या संकटांपासून नागरिकांची सुरक्षा होणार आहे.