खूप दिवस सहन केली, या सडक्या मेंदुच्या विचारांची घाण – रुपाली चाकणकर

0
533

 

पुणे, दि.८ (पीसीबी) – खूप दिवस सहन केली, या सडक्या मेंदुच्या विचारांची घाण, असे म्हणत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ‘आव्हाडसाहेब….आम्ही सोबत आहोत,” या शब्दात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पाठींबा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी अभियंत्याला केलेल्या मारहाण केल्याची बातमी समोर आली. त्यानंतर संपूर्ण राज्यभर हा विषय चर्चेत आला. राज्यभरातून जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका होत असताना मात्र रुपाली चाकणकर यांनी आव्हाडांना समर्थन दिले आहे.

त्याचवेळी फेसबुकच्या माध्यमांतून त्यांनी एक महिला म्हणून राजकारण करताना होणाऱ्या त्रासाबद्दल आपली खंत व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, ”महिला म्हणून राजकारण करताना मीदेखील खुप जवळून अनुभवतेय…मी एखादी प्रतिक्रिया दिली तर त्यावर वैचारिक मत मांडावे ते मला मान्य आहे.पण असं होताना दिसत नाही, एखादी महिला स्वतःच्या कर्तृत्वाने नेतृत्व स्विकारत असेल, विचार मांडत असेल, तिची कार्यप्रणाली समृद्ध होत असेल, आणि तिच्यावर टीका करण्यासारखं हातात काहीच नसेल तर ,तर तिच्या चारिञ्यावर शिंतोडे उडविण्याचा जाहीर कार्यक्रम सोशल मिडीयाच्या माध्यमातून होतो.” असे रुपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे.

”एक व्यक्ती म्हणून आम्ही हे सहन करतो. कारण समाजात चार दोन सडकी डोकी असणार हे गृहीत धरूनच चालतो पण त्याचा परिणाम कुटुंबांवर होत असतो. माझ्यावर अनेकवेळा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका झाली.माझे कार्यकर्ते या हितचिंतकांना समजेल अशा सोप्या भाषेत उत्तरं देत असतात…पण खंतही वाटते जेव्हा मुलगा म्हणतो, मम्मी, नाराज नाही ना तू? लक्ष नको देऊ या लोकांकडे. तू काम करत राहा. माझं कुटुंब, माझा मिञपरिवार, माझे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत ,म्हणून मी बिनधास्त काम करत रहाते. समाजातील प्रत्येक क्षेत्रातील महिला आहेत, ज्यांना या सगळ्या गोष्टींचा प्रचंड ञास होतो…..त्यांनी कोणाकडे आणि कितीदा न्याय मागायचा. आता सुरूवात झालीच आहे तर होऊन जाऊ देत.आव्हाडसाहेब….आम्ही सोबत आहोत,” या शब्दात चाकण कर यांनी आव्हाड यांना पाठिंबा दिला आहे.