Desh

खूप झाले, आता सहन करणार नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा  

By PCB Author

March 10, 2019

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – खूप झाले, आता सहन करणार नाही,  दहशतवादावर गप्प बसणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता पाकिस्तानाला गर्भित इशारा दिला आहे.  

गाझीयाबादमधील सीआयएसफ कॅम्पमध्ये सीआयएसएफ’च्या ५० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते.

यावेळी मोदी म्हणाले की, गणवेश परिधान केलेल्या मुलीची संख्या सीआयएसएफमध्ये खूप मोठी आहे. त्यामुळे या मुलीसोबत मी त्यांच्या आईचेही अभिनंदन करतो, असे मोदी म्हणाले.  सीआयएसएफला देश आणि औद्योगिक प्रतिष्ठानची सुरक्षेचा आधार सांगून मोदींनी सीआयएसएफचे कौतुक केले.

एखादे शेजारी राष्ट्र लढण्यास सक्षम नसेल, तर तो देशातील सुरक्षेला नुकसान पोहोचवण्याचे काम करतो. तो म्हणजे दहशतवादाचे दुसरे नाव आहे, असे म्हणत मोदींनी नांव न घेता पाकिस्तानला टोला लगावला.