खूनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीस चिंचवडमधून अटक

0
988

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – खूनाच्या प्रयत्नासह घातक हत्यार बाळगणाऱ्या एका सराईत फरार आरोपीस पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दिळवीनगर, चिंचवड येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.३०) दुपारी तिनच्या सुमारास करण्यात आली.

अक्षय संपत कांबळे (वय १९, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलीसांना त्यांच्या खबऱ्याकडून चिंचवड येथून विविध गुन्ह्यातील फरार आरोपी अक्षय हा दळवीनगर चिंचवड येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. यावर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दिळवीनगर येथे सापळा रचून आरोपी अक्षय कांबळे याला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक जी.एस.पाटील तपास करत आहेत.