खुशखबर! पुण्यामध्ये १० लाखाहून अधिक रुग्ण कोरोना मुक्त; तरीही विभागात अद्याप ‘एवढे’ कोरोनाबाधित

0
631

पुणे, दि. 10 (पीसीबी): पुणे विभागातील 11 लाख 38 हजार 436 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 13 लाख 31 हजार 641 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 67 हजार 929 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 25 हजार 276 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.49 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 21 हजार 159 रुग्णांपैकी 8 लाख 10 हजार 447 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 96 हजार 434 आहे. कोरोनाबाधित एकूण 14 हजार 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.98 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 23 हजार 301 रुग्णांपैकी 96 हजार 320 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 24 हजार 492 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 489 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 18 हजार 430 रुग्णांपैकी 96 हजार 443 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 18 हजार 796 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 191 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 90 हजार 754 रुग्णांपैकी 71 हजार 138 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 968 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 648 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 77 हजार 997 रुग्णांपैकी 64 हजार 88 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 239 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 14 हजार 188 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 7 हजार 541, सातारा जिल्ह्यात 2 हजार 477, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 908, सांगली जिल्ह्यात 1 हजार 341 तर कोल्हापूर जिल्ह्यात 921 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 18 हजार 119 आहे. पुणे जिल्हयामध्ये 11 हजार 101, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 966, सोलापूर जिल्हयामध्ये 2 हजार 625, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 355 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 72 रुग्णांचा समावेश आहे.
विभागामध्ये लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्हयातील 23 लाख 55 हजार 129, सातारा 6 लाख 33 हजार 189, सोलापूर 4 लाख 4 हजार 684, सांगली 5 लाख 98 हजार 572 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 10 लाख 35 हजार 117 नागरिकांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 74 लाख 26 हजार 952 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 13 लाख 31 हजार 641 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.