Pimpri

खा.श्रीरंग बारणे यांना बंधूशोक , माजी नगरसेवक हिरामनशेठ बारणे यांचे निधन…

By PCB Author

July 31, 2021

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती हिरामणशेठ चंदू बारणे (वय – ७०) यांचे दिर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले..

.ते शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे ते थोरले बंधू होत.. . शिवेसनेचे नगरसेवक निलेश बारणे यांचे वडील होते … . त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. १९७८ पूर्वी थेरगाव गावचे ते उप सरपंच होते. थेरगाव महापालिकेत आल्यानंतर ते पहिले नगरसेवक होते. .. ते समाजकार्यात नेहमी अग्रेसर असायचे..नेहमी नितीमुल्यांची जाण ठेवून सामाजाच्या सामान्य माणसाच्या भल्याचा विचार कऱणारे… स्वच्छ चारित्र, अखंड जनसंपर्क, सतत अभ्यास, अत्यंत साधी राहणी अशी त्यांची ओळख होती .. त्यांच्या निधनामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे..