खासदार श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशनकडून लोकमान्य हॉस्पिटलमध्ये 67 बेडचे कोविड केअर सेंटर

0
665

पिंपरी, दि. 26 (पीसीबी)- खासदार श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने निगडी, प्राधिकरणातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये 67 बेडचे कोविड केअर सेंटर चालू करण्यात आले आहे. त्यामध्ये ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे. रुग्णांच्या सेवेत कोविड केअर सेंटर आजपासून सुरू झाले आहे.
कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी लोकमान्य हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेंद्र वैद्य, डॉ. श्रीकृष्ण जोशी, खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, सचिव रवी नामदे यांनी पुढाकार घेतला.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दिवसाला तीन ते साडेतीन हजार नवीन रुग्णांची भर पडत आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेची रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. खासगी रुग्णालयात देखील बेड उपलब्ध नाहीत. या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने 67 बेडचे कोविड केअर सेंटर चालू करण्यात आले आहे. निगडीतील लोकमान्य नहॉस्पिटलमध्ये हे सेंटर चालू करण्यात आले आहे. त्यात 57 बेड ऑक्सिजनचे आहेत. आयसीयू, व्हेंटिलेटरच्या बेडचीही सुविधा उपलब्ध आहे. खासदार श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येत गंभीर, अतिगंभीर रुग्णांचा समावेश आहे. ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरबेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे