Maharashtra

खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला कोणाचाही विरोध नाही – शरद पवार

By PCB Author

September 25, 2018

पुणे, दि. २५ (पीसीबी) –  साताऱ्यातील  राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला कोणीही विरोध केलेला  नाही. पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन लवकरच खेळीमेळीच्या वातावरणात अंतिम निर्णय घेऊ,  असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवार) येथे सांगितले.  

साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची माझ्यासोबत सोमवारी बैठक झाली. या बैठकीत कोणीही उदयनराजेंच्या नावाला विरोध केला नाही. पत्रकारांनी कशाच्या आधारे बातम्या दिल्या मला माहित नाही, असेही पवार म्हणाले.

आम्ही दोन प्रकारच्या बैठका घेतल्या. पहिली लोकसभेबद्दलची आणि दुसरी विधानसभेबद्दलची. कोणीही उदयनराजेंच्या नावाला विरोध केला नाही. आम्ही लवकरच साताऱ्यातील आमदार, जिल्हाध्यक्ष आणि लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांची बैठक घेऊ आणि खेळीमेळीच्या वातावरणात निर्णय घेऊ, असेही पवारांनी सांगितले.