खासदार उदयनराजे यांचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात स्वागत असेल-नितेश राणे

0
549

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन लवकरच मी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश करणार आहे, असे ट्विट काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचेही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात  स्वागत असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे या पक्षात नितेश राणे जाणार हे निश्चित मानले जात होते. मात्र, त्यांनी उदयनराजे भोसले यांनाही या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे.

उदयनराजे भोसले हे बलाढ्य नेते आहेत, आमचे चांगले मित्र आहेत.त्यांचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात स्वागत, असा ट्विट नितेश राणेंनी केला आहे. त्यांच्या या सूचक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.