Maharashtra

खासदार उदयनराजेंनी घेतली शरद पवारांची भेट; ‘वेट अँड वॉच’चा सल्ला

By PCB Author

September 25, 2018

पुणे, दि. २५  (पीसीबी) – खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटी घेतली. यावेळी पवारांनी उदयनराजेंना ‘वेट अँड वॉच’चा सल्ला दिला. चर्चेअंती निर्णय घेऊ, असे आश्वासन यावेळी पवारांनी दिल्याचे समजते. त्यामुळे उदयनराजेंच्या उमेदवारीचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये, म्हणून बारामतीमध्ये सोमवारी (दि.२४) सकाळी उदयनराजेंच्या विरोधकांनी शरद पवारांची भेट घेऊन साकडे घातले होते. त्यामुळे संध्याकाळी उदयनराजेंनी तातडीने पवार यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती.  त्यानंतर पुण्यात उदयनराजेंनी पवारांची भेट घेतली.

काहीच दिवसांपूर्वी उदयनराजेंनी पवारांची भेट घेतली होती.  पवार साहेबांविषयी काय बोलायचे.. एवढे मोठे नेते आहेत, आपल्या सगळ्यांना लाजवेल, या वयातही एवढी धावपळ करतात. काय बोलायचं त्या माणसाविषयी… ठिक आहे.. म्हटलं, फसवाफसवी करु नका फक्त, नाहीतर आपल्याला पण कळते..  असे उदयनराजे यांनी या भेटीनंतर म्हटले होते.