खासदार उदयनराजेंना आम्ही राजे मानत नाही – जयदीप कवाडे

0
509

सातारा, दि. ३० (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आमच्या लेखी राजे आहेत. दलित समाजाला कस्पटासमान समजणारे आणि अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल जाहीरपणे भाष्य करणारे खासदार उदयनराजे भोसले आमच्या लेखी राजे नाहीत. राजाने राजासारखे वागावे. आम्ही त्यांचा सन्मान करतो पण उदयनराजेंना आम्ही राजे मानत नाही,’ असे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी म्हटले आहे.

साताऱ्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा मेळावा आयोजित केला होता. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.