खासदार अमोल कोल्हे यांच्या भाषणाचे पंतप्रधान नरेंद्र मोंदीकडून कौतुक

0
532

दिल्ली, दि, २७ (पीसीबी) – शिरूरचे नवनिर्वाचित खा. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरु आहे. तर आता कोल्हे यांची दिल्ली दरबारी देखील चर्चा होत आहे. लोकसभेत गेल्यानंतर खा. कोल्हे यांनी सोमवारी पहिले भाषण केले. या पहिल्या अभ्यासपूर्ण भाषणाने अमोल कोल्हे यांनी संसद देखील दणाणून सोडली. विशेष म्हणजे त्यांच्या या भाषणाची नोंद खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. तर कोल्हे यांचे कौतुक देखील केले.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले अधिवेशन सुरु आहे. सोमवारी मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणा नंतर लोकसभेत भाषण केले. या भाषणात मोदींनी अभ्यासपूर्ण भाषण केल्याबद्दल काही मोजक्या खासदारांचा उल्लेख केला. त्यात अमोल कोल्हे यांच्या नावाचाही समावेश होता. अमोल कोल्हे यांनी संसदेत शेती, बैलगाडा शर्यत, गडकिल्ले अशा अनेक विषयांबाबत भाष्य करत सरकारचे लक्ष्य वेधून घेतले. यावेळी त्यांनी केलेली विषयांची मांडणी आणि वक्तृत्वशैलीमुळे कोल्हे यांचे कौतुक झाले.

दरम्यान कोल्हे यांनी आपल्या भाषणात बैलगाडा शर्यती बाबत लक्ष वेधून घेणारे मुद्दे मांडले होते. तसेच शेतकरी आत्महत्या आणि राज्यात झालेली शेतकऱ्यांची दैनी अवस्था याबाबत भाष्य केले. त्यामुळे अशा अभ्यासपूर्ण भाषणाची नोंद सत्ताधारी मोदी सरकारला देखील घ्यावी लागली.