खाजगी मालमत्तेत घुसखोरी करून ज्येष्ठास दमदाटी; तिघांवर गुन्हा दाखल

0
249

रहाटणी, दि. १८ (पीसीबी) – ज्येष्ठ नागरिकाच्या खाजगी मालमत्तेमध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी केली. तसेच त्यांना दमदाटी केली. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रहाटणी येथे 18 डिसेंबर 2020 रोजी घडली.

वासुदेव जमुनाप्रसाद शर्मा (वय 62 रा. विष्णु प्रिया अपार्टमेंट, रहाटणी) यांनी शनिवारी (दि. 17) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर 2020 रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांच्या खासगी मालमत्तेमध्ये प्रवेश केला. तसेच फिर्यादी यांना दमदाटी करून आरोपी निघून गेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.