खळबळजनक! पुण्यातील उच्चशिक्षीत विवाहितेचा शारिरिक, मानसिक छळ

0
498

पुणे, दि. 1 (पीसीबी) : बड्या उद्योजक कुटुंबातील तिघांसह 8 जणांविरूध्द हुंडा प्रतिबंधक कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 27 वर्षीय पिडीत विवाहीतेने चतुःश्रृंगी पोलिस फिर्याद दिली आहे. गणेश नानासाहेब गायकवाड (36), नानासाहेब शंकरराव गायकवाड , नंदा नानासाहेब गायकवाड (तिघे रा. औंध, पुणे), सोनाली दिपक गवारे, दिपक निवृत्ती गवारे (दोघे रा. जेएम रोड, पुणे) , दिपाली विरेंद्र पवार (रा. औंध, पुणे), भागीरथी पाटील (रा. औंध, पुणे, राजु अंकुश (सध्या रा. सांगवी, पुणे. मुळ रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीनुसार, पिडीत विवाहीता यांचा दि. 23 जानेवारी 2017 रोजी साखरपुडा झाला. त्यानंतर गणेश गायकवाड यांच्याशी पिडीत विवाहीतेचे लग्न झाले होते.

तेव्हापासुन दागिने आणि हुंडयाच्या कारणावरून पिडीतेला सतत त्रास देण्यात येत होता. लग्नातील चांदीची भांडी व देवपुजेचे साहित्य, पिडीतेचा पासपोर्ट, डिग्री सर्टिफिकेट, पॅनकार्ड आणि इतर महत्वाची कागदपत्रे ही गणेश गायकवाड यांनी पिडीतेला त्रास देण्याच्या उद्देशाने फसवणूक करून सुस गाव येथील फार्म हाऊसवर दडवून ठेवली आहेत असा आरोप पिडीतेने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत केला आहे. दरम्यान, पिडीतने पती, सासु आणि सासर्‍यांनी वेळावेळी त्रास दिला असल्याचा आरोप केला आहे. इतरांनी देखील त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर पिडीतेच्या कानावर मारहाण झाल्याने पिडीतेचा उजवा कान पुर्णपणे बहिरा झाला आहे. कान पुर्णपणे बहिरा झाल्याबाबत वैद्यकीय तपास करण्यात आली असून त्याला पोलिसांनी दुजोरा देखील दिलेला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सर्वांनीच माझा शारिरिक, मानसिक आणि अमानवीय, अमानुष असा छळ केला आहे असा आरोप फिर्याद देणार्‍या पिडीत विवाहीतेने केला आहे. पिडीत विवाहीता यांचं बीबीएपर्यंत शिक्षण पुर्ण झालेलं आहे. पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीमध्ये प्रचंड धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्हयाबाबत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. उद्योजक कुटुंबावर विवाहीतेचा शारिरिक व मानसिक छळ तसेच फसवणुकीबाबत गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.गुन्हयाचा अधिक तपास चतुःश्रृंगी पोलिस करत आहेत.