खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ

0
914

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. केंद्र सरकारने खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ केली आहे. धानाच्या हमीभावात २०० रुपये प्रति क्विंटलने वाढ केली आहे. त्यामुळे कर्जबाजारीपणा, नापिकी आणि दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना हातभार लागणार आहे.    

आज (बुधवार) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी या निर्णयाला मंजुरी दिली आहे. धानाच्या किमान आधारभूत किंमतीत २०० रुपयाने वाढ करून १८०० रूपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. दहा वर्षानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. या आधी २००८-०९मध्ये यूपीए सरकारने १५५ रुपयांची वाढ केली होती.

त्याचबरोबर १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली आहे. त्यांच्या एमएसपीमध्ये ९०० रुपयांवरून २,७०० रुपये प्रति क्विंटल केली आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ३३ हजार ५०० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. वाढवण्यात आलेल्या एमएसपीचे मूल्य जीडीपीच्या ०.२ टक्के आहे. तर अतिरिक्त खर्चात धानासाठी १२ हजार ३०० कोटी रुपये खर्च होणार आहे.