Pune Gramin

खराबवाडी येथे सिलेंडरच्या स्फोटात पाणीपुरी विक्रेत्याचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी  

By PCB Author

June 27, 2019

चाकण, दि. २७ (पीसीबी) – घरामध्ये सिलेंडरची गॅसगळती होऊन सिगारेट पेटवताना झालेल्या स्फोटात  एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना आज (गुरूवार)  पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चाकण तळेगाव रस्त्यावरील खराबवाडी येथे एका पाणीपुरी विक्रेत्याच्या घरात घडली.

मांगीलाल चौधरी असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर ओमप्रकाश लोहार असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  दोघेही पाणीपुरी विक्रेते आहेत. लोहार ८० टक्के भाजले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश पहाटे उठल्यानंतर त्यांनी गॅसवर पाणी तापवायला ठेवले. पण गॅस पेटला नाही. त्यामुळे गॅस हळू-हळू लिक होऊ लागला. एवढ्यात मांगीलाल झोपेतून उठले. गॅसवर पाणी तापतंय हे पाहून ते पुढील कामासाठी बाहेर पडू लागले. मांगीलाल दारात उभे असताना ओमप्रकाश यांनी सिगरेट पेटवण्यासाठी काडी पेटवली आणि मोठा स्फोट झाला.

यामध्ये ओमप्रकाश ८० टक्के भाजले. तर दरवाजात उभे असलेले मांगीलाल घराबाहेर फेकले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.