खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया…

0
373

मुंबई,दि.२३(पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावर चर्चा झाली असं सांगितलं जात आहे. याचसंबंधी विचारण्यात आलं असता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र नकार दिला. एकनाथ खडसेंबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

“एकनाथ खडसे यांच्याबाबत कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. बैठकीत जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत चर्चा झाली,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. तसंच एकनाथ खडसेंच्या नाराजीबाबत त्यांच्या पक्षाने विचार करावा असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.

दरम्यान सोबतच राजकारणात जर-तरला महत्त्व नसते असं सांगत एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाचं वृत्त फेटाळलं.