खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धक्कादायक घटना; रेल्वे स्थानका समोर 35 वर्षीय व्यक्तीचा खून

0
417

पुणे, दि.०७ (पीसीबी) : खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्थानका समोर 35 वर्षीय व्यक्तीचा घातक हत्याराने डोक्यात व कपाळावर वार करून खून केला आहे. खून करणारा अज्ञात असून, खडकी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रमजान सय्यद (रा. खडकी) असे या खून झालेल्याचे नाव आहे. खडकी पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी की, येथील खडकी रेल्वे स्थानक परिसरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार खडकी पोलिस येथे दाखल झाले. त्यावेळी रमजान याच्या डोक्यात, कपाळावर आणि शरीरावर हत्याराने वार केल्याचे समोर आले. खून केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. खुनाचे कारण समजू शकलेले नाही.