खडकीत डीजेला परवानगी नाकारल्याने कार्यकर्त्यांनी पोलिसाच फोडल डोक

0
638

पुणे, दि. २४ (पीसीबी) –  डीजे लावण्यासाठी एनओसी न दिल्याच्या रागातून गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खडकी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबला जबर मारहाण करुन त्यांचे डोक फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

थिटे असे गंभीर जखमी झालेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी डीजे लावण्यास एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) न दिल्याच्या रागातून थिटे यांच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार करुन त्यांना गंभीर जखमी करण्यात आले.  या प्रकरणी दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असून खडकी पोलीस पुढील तपास करत आहेत.