खडकीतील लष्करी रुग्णालयात मूकबधिर महिलेवर बलात्कार

603

पुणे, दि. १७ (पीसीबी) – एका मूकबधिर महिलेने लष्कराच्या चार जवानांवर बलात्काराचा आरोप केला आहे. खडकीतील लष्करी रुग्णालयात ही घटना घडली आहे. या महिलेने तिची तक्रार संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुखांनी पाठवली आहे.

याप्रकरणी पुण्यातील खडकी येथील लष्करी रुग्णालयात तैनात असलेल्या चारही जवानांवर विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने इंदूरमध्ये तक्रार दाखल केली. तिच्यावर झालेल्या अन्यायासंबंधी तिने संरक्षण मंत्री आणि लष्करप्रमुखांना पत्र पाठवले आहे.