खडकवासला धरणातून २७ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; भिडे पूल पाण्याखाली

0
737

पुणे, दि. ४ (पीसीबी) – गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे  खडकवासला धरण ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे धरणातून २७ हजार क्युसेक्स  पाण्याचा विसर्ग वाढवल्याने  पुण्यातील डेक्कनला जोडणारा भिडे पुल पाण्याखाली गेला आहे.

मुसळधार पावसामुळे  पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत. धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खडकवासला धरणाचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत.  खडकवासला धरणातून मुळा-मुठा नदीमध्ये  २७ हजार क्यूसेक्स  पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

डेक्कनला जोडणारा भिडे पुल पुन्हा पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर नदी पात्रातील रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मुळशी धरणातून देखील सकाळी आठ वाजेपासून पंधरा हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.  त्यामुळे नदी काठावरच्या  नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.