खंडोबा चौकातील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा

0
163

आकुर्डी, दि. २२ (पीसीबी) – खंडोबा चौकात तपस्वी प्लाझा मध्ये असलेल्या सौलस्प्रिंग बॉडीकेअर स्पा सेंटरवर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून कारवाई केली. स्पा सेंटर मध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सात महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 20) सायंकाळी करण्यात आली.

स्पा सेंटर मालक मनीष गोला (वय अंदाजे 29, रा. बिजलीनगर, चिंचवड), स्पा सेंटरचा मॅनेजर विकास आबासाहेब पाटील (वय 27, रा. तंगवाना, पो. महाळशेवगे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडोबा चौकात तपस्वी प्लाझा मध्ये असलेल्या सौलस्प्रिंग बॉडीकेअर स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून स्पा सेंटरवर छापा मारला.

आरोपींनी सात महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले होते. वेश्या व्यवसायाच्या पैशांतून त्यांची उपजीविका भागवत होते. पोलिसांनी सात महिलांची सुटका करत स्पा सेंटर मालक मनीष गोला याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.a