खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेसचा डब्बा रुळावरून घसरला

0
1014

लोणावळा, दि. ७ (पीसीबी) – मुंबई – पुणे मार्गावर खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, यामुळे मुंबई – पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या सिंहगड एक्सप्रेस, प्रगती एक्‌स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या रद्द झाल्याची घोषणा केली जात आहे.

मध्यरात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास बोगी रुळावरून खाली घसरली. ही बोगी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पुण्याच्या दिशेला ही रेल्वे येत असताना खंडाळ्याजवळ अचानक मागच्या इंजिनचे प्रेशर वाढले आणि ही एक बोगी लोहमार्गावरून खाली उतरली. ती बोगी हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, घसरलेली बोगी सोडून रेल्वे पावणे सहा वाजता पुढे मार्गस्थ झाली आहे.

यामुळे डाऊन लाईनवरील वाहतूक बंद असून, मुंबईकडून येणाऱ्या रेल्वे या मिडल लाईनवरून पुण्याला येत आहेत. तर मुंबईला जाणाऱ्या अप लाईन वरून धावत आहेत. या अपघातामुळे रेल्वे पंधरा मिनिटे उशिरा धावत आहेत.