Pune Gramin

खंडाळा घाटात दरड कोसळली; डेक्कन क्वीन रद्द्

By PCB Author

July 27, 2019

लोणावळा, दि. २७ (पीसीबी) – मुसळधार पावसामुळे खंडाळा घाटातील लोहमार्गावर आज (शनिवार) दुपारी दरड कोसळली. यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. तर दरड कोसळल्याने आज संध्याकाळी मुंबईहून सुटणारी आणि रविवारी (दि.२८) सकाळी सुटणारी डेक्कन क्वीन रद्द् करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

रेल्वे मार्गावर दरडीसह झाडे कोसळले आहे. यामुळे रेल्वे मार्गाची मिडल व डाऊन लाईन बंद झाली आहे. दरड हटविण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

घाट मार्गावरील धोकादायक दरडी काढण्याच्या कामाकरिता रेल्वेने पंधरा दिवस या मार्गावरील जवळपास वीस गाड्या रद्द केल्या आहेत. त्यातच आज पुन्हा दरड कोसळली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे.