Pune Gramin

खंडाळा घाटात कार कोसळून एकजण ठार; ३ जण जखमी

By PCB Author

September 28, 2018

लोणावळा, दि.२८ (पीसीबी) – खंडाळा घाटातील टायगर पॉईंटजवळ आज (शुक्रवारी) पहाटेच्या सुमारास एक कार १५० फूट दरीत पडून एकाचा मृत्यू झाला.  तर तिघेजण बचावले. आज पहाटे ३ वाजून ५८ मिनिटांनी शिवदुर्ग टीमला आयएनएस. शिवाजीपासून लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या घाटात एक चारचाकी महिंद्रा एक्सयुव्ही ५०० दरीत कोसळल्याचा फोन आला. यानंतर पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली.

या अपघातात मनिष रमेश प्रीतवानी (वय २५ रा. खारघर) हा तरूण ठार झाला. तर संतोष पाटील, भक्ती पाटील आणि अमोल कुंटे हे तिघेजण या अपघातात जखमी झाले आहेत. या तिघांनाही लोणावळा येथील स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने सकाळी सहाच्या सुमारास मृत तरूणाचा मृतदेह बाहेर काढला.