‘क्लासिक पुणे श्री २०२० बॉडी बिल्डर स्पर्धेत’ शुभम वाईकर ने पटकावला प्रथम क्रमांक

0
443

औंध,दि.१७(पीसीबी) – म्हाळू पार्वती प्रतिष्ठान पुणे व महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनशी संलग्न पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहीद तुकाराम ओंबळे मैदान, गोखलेनगर, पुणे येथे दिनांक १५ फेब्रुवारी २०२० रोजी पार पडलेल्या “क्लासिक पुणे श्री २०२०” या स्पर्धेत औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील शुभम वाईकर या विद्यार्थ्याने ७० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच संपूर्ण स्पर्धेमध्ये ‘मोस्ट इंम्प्रुव्हड बॉडी बिल्डर’ हा किताब मिळविला.

त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे साहेब यांनी त्यांचे अभिनंदन करून, त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या या यशामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह क्रीडा विभागप्रमुख प्रा.बी.एस. पाटील, उपप्राचार्य डॉ.संजय नगरकर तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग असून, सर्वांनी त्याचे अभिनंदन करीत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.