क्रेडिट कार्डची लिमिट वाढवतो असते म्हणत केली लाखोंची फसवणूक

0
192

मोशी, दि. २२ (पीसीबी) – क्रेडिट कार्डची लिमिट वाढवण्याचे आमिष दाखवून गोपनीय माहिती घेऊन एक लाख 67 हजारांची फसवणूक केली. ही घटना 20 फेब्रुवारी रोजी रात्री मोशी येथे घडली. याबाबत 21 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रणजीत अरुण पाटील (वय 33, रा. बोराटेवाडी, मोशी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7518961910 या क्रमांकावरून बोलणा-या अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 फेब्रुवारी रोजी रात्री सात वाजता फिर्यादी यांना 7518961910 या क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्ती एसबीआय कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगत होती. फोनवरील अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना नवीन क्रेडिट कार्डची लिमिट वाढविण्याचे अमिष दाखवले. त्यांच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी कोड पाठवला. त्यानंतर फिर्यादी यांना तो ओटीपी कोड विचारून फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्ड मधून एक लाख 67 हजार रुपयांचे ट्रांजेक्शन करत त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.