Pune Gramin

क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 23 हजारांची फसवणूक

By PCB Author

April 15, 2024

हिंजवडी, दि. १५ (पीसीबी) – क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत एका व्यक्तीची 22 हजार 999 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 21 फेब्रुवारी रोजी माण रोड, हिंजवडी येथे घडली.

विनीत मोहन अग्रवाल (वय 43, रा. माण रोड, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार btc.india@axl या युपीआय आयडी वापरणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अग्रवाल यांच्याशी इन्स्टाग्राम वरून संपर्क केला. अग्रवाल यांना क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून त्यातील गुंतवणुकीवर दुपटीपेक्षा अधिक फायदा होईल असे आमिष दाखवले. त्यातून अग्रवाल यांनी प्रथम पाच हजार त्यानंतर 17 हजार 999 रुपये असे एकूण 22 हजार 999 रुपयांची गुंतवणूक करत फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.