Chinchwad

क्रिकेट खेळताना चकर येऊन चिंचवड येथील तरुणाचा मृत्यू

By PCB Author

February 11, 2019

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – क्रिकेट खेळताना चकर येऊन एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १०) सायंकाळी पाचच्या सुमारास कासारसाई येथे घडली.

वसीम अजीज मुलानी (वय ३२, रा. चिंचवड) यांचा मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळच्या सुमारास वसीम क्रिकेट खेळण्यासाठी कासारसाई येथे गेला होता. या दरम्यान, क्रिकेट खेळताना त्याला अचानक चकर आली आणि तो खाली कोसळला. हे पाहताच त्याच्या काही मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारपूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.