Notifications

क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी भाजपात; वडील आणि बहीण काँग्रेसमध्ये, जडेजाचाही भाजपला पाठिंबा

By PCB Author

April 16, 2019

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने अखेर कोणत्या पक्षाला पाठिंबा जाहीर करणार, याचे उत्तर दिले आहे. रवींद्र जडेजाची पत्नी  रिवावाने महिनाभरापूर्वीच भाजपात प्रवेश केला होता. आता रवींद्र जडेजानेही ट्विटरवरुन भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. रवींद्र जडेजाची मोठी बहीण नयनाबा जडेजा आणि वडील अनिरुद्ध सिंह यांनी रविवारी जामनगरमधील कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नयनाबा या सरकारी रुग्णालयात परिचारिका होत्या. महिला सशक्तीकरणासाठी काम करायचे असल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी म्हटले होते.