‘क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅज्युएट थी’; स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेवर काँग्रेसचा चिमटा

0
538

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – केंद्रीय मंत्री स्‍मृती इराणी यांनी  उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघातून लोकसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. अर्जासोबत त्यांनी आपले शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे. या अर्जात स्‍मृती इराणी यांनी आपली शैक्षणिक पात्रता १२ वी असल्याचे नमूद केले आहे. यावरून काँग्रेसने स्‍मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेत्या  व प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा धागा पकडत  ‘क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅजुएट थी’, असे म्हणत स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे.

प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की,  ‘क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅजुएट थी’  नावाची नवीन मालिका येणार आहे. याची सुरुवातीचे  ओळ अशी असणार  आहे की, ‘क्वालिफिकेशन के भी रूप बदलते हैं, नए-नए सांचे में ढलते हैं। एक डिग्री आती है, एक डिग्री जाती है, बनते हलफनामे नए हैं…क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅजुएट थी.’

स्मृती इराणी यांनी कशापद्धतीने पदवीनंतर परत बारावीला कसे जायचे हा शिक्षणाचा नवीन दाखला दिला आहे. हे फक्त आणि फक्त मोदी सरकारच्या काळातच शक्य आहे.  यासोबतच प्रियांका चतुर्वेदी यांनी इराणी यांनी २००४, २०११, २०१४ च्या शपथपत्राचे फोटो शेअर केले आहेत.