Chinchwad

“क्या दिखती है बॉस” म्हणत तरूणीची छेडछाड करणारा गजाआड

By PCB Author

October 06, 2018

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – क्या दिखती है बॉस, असे म्हणत दुचाकीवरून पाठलाग करत एका तरूणाने २१ वर्षीय तरूणीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नवी सांगवीतील फेमस चौक ते क्रांती चौकाच्या दरम्यान घडला. या प्रकरणी तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे.

सोन्या उर्फ विक्रांत वसंत जगताप (वय २४, रा. राजारामनगर, नवी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकीस्वार तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी पीडीत तरूणी पल्लवी विजय कानाडे (वय २१, सागर कॉम्प्लेक्स, विनायकनगर, क्रांतीचौकाजवळ, नवी सांगवी) हिने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत तरूणी नवी सांगवीतील फेमस चौक, क्रांती चौकातून ये-जा करत असताना आरोपी विक्रांत दुचाकीवरून येवून तीचा पाठलाग करायचा. ती जात असताना तिच्या आजूबाजूने दुचाकीवरून कट मारत असे. “क्या दिखती है बॉस, चलती क्या, ऐ चिकनी चल आती क्या” असे म्हणत आरोपी पीडीत तरूणीची छेडछाड करायचा. हा प्रकार मे २०१८ पासून सुरू होता. परंतू भीती पोटी पीडीत तरूणी मुठ गिळून गप्प बसायची. अखेर पीडीत तरूणीने आरोपीच्या छेडछाडीला कंटाळून पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तरूणाला अटक केली आहे. सांगवी पोलिस तपास करत आहेत.