कोविड-१९ मुळे तणावग्रस्त आहात ? चिंता नको. मानसशास्त्रीय समुपदेशन केंद्र सुरू 

0
414
पिंपरी, दि. २५ (पीसीबी) –  यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना कोरोना या आजारा व लॉक डाउन मुळे नैराश्य व गोंधळलेली स्थिती किंवा भीती व चिंता याबाबत माहिती व  समुपदेशन/ मार्गदर्शन केंद्र पदव्युत्तर संस्था वाय. सी. एम. हॉस्पिटलच्या मानस शास्त्र विभागा मार्फत सुरू करण्यात आले असून  या केंद्रात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रुग्णांचे नातेवाईक,व इतर नागरिक यांना करोना बाबत माहिती व  मार्गदर्शन , समुपदेशन व मानसिक आधार तसेच आनुषंगिक मदत देण्यासाठी  रुग्णालयातील प्रदीर्घ अनुभव असलेले कार्यरत वैद्यकीय व मनोसामाजीक समाजसेवक यांच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे अधिष्ठाता डॉ राजेंद्र वाबळे  व सर्व प्रशासन  याकामी प्रभावी पणे सक्षम सेवा देण्यास सज्ज झाले आहे याकामी वैद्यकीय समाजसेवक श्री बोत्रे,श्री आमले ,श्री गायकवाड ,श्री ढवळे व श्रीमती सुवर्णकार व मनोसामाजीक समाज सेवक श्री जुंकटवार  या केंद्राचे कामकाज पाहत आहेत. अधिक माहिती करिता  02067332297 या संपर्क  क्रमांकावर नागरिक माहिती घेऊ शकतील.