Pimpri

कोविड समर्पित रुग्णालयांपैकी वायसीएमचा मृत्यूदर सर्वात कमी

By PCB Author

July 01, 2020

पिंपरी, दि. 1 (पिसिबी): पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण वाढले असले तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. तर, मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी आहे. कोरोनावर कोणतेही ठोस औषध उपलब्ध नसताना महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येताना दिसून आहेत. पालिकेच्या कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयात आजपर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला असून त्याचे प्रमाण केवळ 1.86 टक्के आहे. राज्यातील कोविड समर्पित रुग्णालयांपैकी वायसीएमएचचा मृत्यूदर सर्वात कमी आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील कोविड समर्पित रुग्णालयांचा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्नारे आढावा घेतला. त्यामध्ये राज्यातील सर्व कोविड समर्पित रुग्णालयांच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले. त्यात पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सर्वात कमी मृत्यूदर असल्याचे दिसून आले.  मृत्यूदर आणखी कमी  व्हावा यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर, नर्स यांच्याकडून रुग्णांची पूर्ण काळजी घेतली जाते. कोणतेही ठोस औषध, लस उपलब्ध नसताना कोरोना बाधित रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवून इच्छाशक्ती प्रबळ केली जात आहे. डॉक्‍टर, नर्स यांच्याकडून योग्य उपचार व मार्गदर्शन रुग्णांना मिळत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले.

वायसीएम रुग्णालयात 12 एप्रिल रोजी शहरातील कोरोनाचा पहिला बळी गेला.  थेरगाव भागातील एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरातील 30 आणि शहराबाहेरील पण वायसीएम रुग्णालयात उपचार घेणा-या 30 अशा एकूण 60 जणांचा वायसीएममध्ये मृत्यू झाला आहे. मृत्यूचे हे  प्रमाण केवळ 1.86 टक्के आहे. राज्यातील कोविड समर्पित रुग्णालयांपैकी सर्वात कमी मृत्यूदर वायसीएम रुग्णालयाचा आहे. त्यामुळे डॉक्टर, नर्स, पालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येताना दिसून येत आहे.

मृत्यूदर आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न – अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविड समर्पित रुग्णालयाचा आढावा घेतला. त्यात रुग्णालयांचे सादरीकरण करण्यात आले. राज्यातील कोविड समर्पित रुग्णांलयापैंकी वायसीएम रुग्णालयाचा सर्वात कमी मृत्यूदर असल्याचे दिसून आले. ते आपले निरीक्षण होते.  आणखी मृत्यूदर कमी असला पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

शहराबाहेरील पण वायसीएम रुग्णालयात  उपचार घेत असलेले 30 आणि शहरातील 30 अशा 60 जणांचा वायसीएम रुग्णालयात आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचे प्रमाण 1.86 टक्के आहे. तर, खासगी रुग्णालयात काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण कमी राखण्यात डॉक्टर, नर्स सर्वांचे यश आले आहे.

या रुग्णानाल्यात मृत्यूदर आणखी  कमी करायचा आहे. त्यासाठी नागरिकांनी कोरोनाची लक्षणे दिसल्याबरोबर महापालिका रुग्णालयात दाखल व्हावे. जेवढ्या लवकर रुग्ण निदर्शनास येतील. तेवढा मृत्यूदर कमी ठेवण्यात यश येणार आहे.

पॉझिटीव्ह रुग्ण लवकरात लवकर शोधणे आणि रुग्णावर उपचार करणे हे त्याचे गमक आहे. त्यादृष्टीने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी केले.