कोल्हापूर; इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम अखेर रद्द

0
391
कोल्हापूर, दि.२८ (पीसीबी) – शिवाजी विद्यापीठाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी आज शिवमहोत्सवाचे आयोजन केले आहे. याच महोत्सवाला सायंकाळी चार वाजता इंदोरीकर महाराज उपस्थित राहणार होते. मात्र शिवाजी विद्यापीठात आज होणारा निवृत्ती देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम अखेर रद्द झाला आहे. कार्यक्रमस्थळी वेळेत पोहोचणे शक्य नसल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह शहरातील पुरोगामी संघटनांनी कडाडून विरोध दर्शवल्याने वाद टाळण्यासाठी इंदोरीकरांनी कार्यक्रमातून माघार घेतल्याची चर्चा आहे.