कोल्हापूरमधून धनंजय महाडिक, रायगडात सुनिल तटकरेंना राष्ट्रवादीची उमेदवारी

0
968

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी  रायगड मतदासंघातून सुनिल तटकरे आणि कोल्हापूर मतदारसंघातून खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेवारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी शिक्कामोर्तब  केला.  मुंबईत झालेल्या बैठकीत पवार यांनी नेत्यांशी चर्चा करुन हा निर्णय जाहीर केला.  

रायगडमधून भास्कर जाधव निवडणूक लढलण्यास इच्छुक होते. मात्र, पवार यांनी त्यांची समजूत काढली.  त्याचबरोबर कोल्हापूर मतदारसंघातही   महाडिक यांच्या  उमेदवारीला आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह स्थानिक नेत्यांनी  विरोध  केला होता.  मात्र  पवारांनी महाडिक यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.

याशिवाय उस्मानाबादमधून माजी मंत्री दिलीप सोपल, पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांची नावे चर्चेत आहेत. तर बीडमधून जयदत्त क्षीरसागर, अमरसिंह पंडित आणि बजरंग सोनवणे यांची नावे आघाडीवर आहेत. परभणी मतदारसंघातील उमेदवारीसाठी बाबाजानी दुर्राणी आणि विजय भांबळे यांच्यात चुरस आहे. आजच्या प्राथमिक चर्चेनंतर लवकरच या मतदारसंघाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. २०१४ च्या  लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादीचे केवळ ४ उमेदवार निवडून आले होते.