Maharashtra

कोल्हापुरात शिवशाही बसला अपघात; वाहक ठार १९ प्रवासी जखमी

By PCB Author

October 05, 2018

कोल्हापुर, दि. ५ (पीसीबी) – पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी टोल नाका येथे शिवशाही बसला अपघात झाला आहे. या अपघातात बसचा वाहक ठार झाला असून १९ प्रवासी जखमी आहेत. हा अपघात आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास झाला.

सागर सुधाकर परब ( वय ३०, रा. कलेली, ता. कुडाळ) असे मृत वाहकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास शिवशाही बस पुण्याहून कुडाळला जात होती.  यावेळी किणी टोल नाक्याजवळ समोरच्या ओमनी गाडीस ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्यापासून बाजुला गेली. डाव्या बाजुला बस कलंडून अपघात झाला. यात वाहकाचा मृत्यू झाला तर बसमधील १९ प्रवासी जखमी आहेत. जखमींमध्ये कुडाळ आणि पुणे येथील प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.