कोल्हापुरात ‘आमचं ठरलंय’ फॅक्टर जोरात; शिवसेनेची जोरदार मुसंडी

0
424

कोल्हापुर, दि. २३ (पीसीबी) –  कोल्हापुरातून राष्ट्रवादीला धक्का देणारे कल येत आहेत. ‘आमचं ठरलंय’ फॅक्टर जोरात चालला आहे… सध्या तरी असेच म्हणावे लागेल. कारण राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक तब्बल मतांनी ६३ हजार पिछाडीवर आहेत.

धनंजय महाडिक यांना काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी उघड विरोध केला होता. खुद्द शरद पवारांनी सांगूनही पाटलांनी त्यांचे ऐकले नाही.

माझ्या मताधिक्यामध्ये सतेज पाटलांचा मोठा वाटा आहे, असे स्वत: शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक म्हणाले आहेत. त्यांच्या याच वक्तव्याने आमचं ठरलंय…’! या फॅक्टरला दुजोरा मिळाला आहे.