Maharashtra

कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर

By PCB Author

May 29, 2019

कोल्हापूर, दि. २९ (पीसीबी) –  लोकसभा निवडणुकीत  राष्ट्रवादीचे  उमेदवार  धनंजय महाडिक यांचा शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला. दरम्यान, महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली. यानंतर महाडिक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

महाडिक यांचे कार्यकर्ते भाजप प्रवेशाबाबत दबाव आणत आहेत,  या पार्श्वभूमीवर महाडिक यांच्या भाजप प्रवेशाच्या घडामोडी  घडत आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा पराभव केला. महाडिक यांनी २०१४ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा ३३ हजार मतांनी पराभव केला होता.

दरम्यान, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी युतीचे उमेदवार  संजय मंडलिक यांचा जाहीर  प्रचार सुरू केला होता. पाटील समर्थकांनी ‘आमचं ठरलंय’  ही  घोषणा देत मंडलिकांच्या विजयात मोठे योगदान दिले आहे. ‘आमचं ठरलंय’, ही कॅचलाईन लोकसभा निवडणुकीच्या  प्रचारात चांगलीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याचे पडसाद लोकसभेच्या निकालात उमटल्याचे दिसून आले.