कोल्हापुरातील दोन तरूणीसह एक तरूण गणपतीपुळेतील समुद्रात बुडला

0
821

रत्नागिरी,  दि. १७ (पीसीबी) – गणपतीपुळे  येथील समुद्रात दोन तरूणीसह एक तरूण बुडला. ही घटना   आज (शनिवार)  सकाळी घडली. दोघींचा मृतदेह सापडला असून तरूण बेपत्ता झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. हे तिघेजण कोल्हापूरहून  पर्यटनासाठी आले होते.    

काजल  जयसिंग मचले  (वय १८), सुमन विशाल मचले  (वय २३) आणि उमेश बागडे (वय २७) अशी मृतांची नावे आहेत. त्यातील सुमन आणि काजलचा मृतदेह सापडला असून, उमेश बेपत्ता आहे.

कोल्हापुरातील कसबा बावडा येथील तिघे जण पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले होते. आज सकाळी  तिघेजण समुद्रात पोहण्यासाठी उतरले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले.

तर किसन मचले, पूजा बागडे, निर्मला मचले आणि ऐश्वर्या नारकर या चौघांना वाचवण्यात सुरक्षा आणि जीवरक्षकांना यश आले आहे.