कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे घालून येण्यास मनाई

0
473

कोल्हापूर, दि. १ (पीसीबी) – कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना  मनाई करण्यात आली आहे. देवस्थानच्या महाराष्ट्रातील ३ हजार मंदिरांमध्ये हाच निर्णय लागू करण्यात आला आहे, अशी माहिती देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

तोकड्या कपड्यांमध्ये मोबाइलवरून फोटो काढण्यासही बंदी घालण्यात आली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून या मंदिरात भाविक येत असतात. या सगळ्यांनी भारतीय पोशाखातच आले पाहिजे. हा पोशाख अंगभर असावा, अंगप्रदर्शन करणाऱ्या किंवा तोकड्या कपड्यांमध्ये भाविक आल्यास त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे देवस्थान समितीच्या वतीने सांगिण्यात आले आहे.

पुरुष  आणि महिलांना हा नियम लागू असेल. जे भाविक या मंदिरात येतात त्यांना अशा लोकांकडे पाहून मनात लज्जा उत्पन्न होते, तसेच अनेक भाविकांनी यासंबंधी तक्रारीही केल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे देवस्थान समितीने म्हटले आहे.