Desh

कोलकात्यामध्ये बॉम्बस्फोट; सात वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; ९ जण गंभीर जखमी

By PCB Author

October 02, 2018

कोलकाता, दि. २ (पीसीबी) – पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहरातील डमडम परिसरात आज (मंगळवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात सात वर्षांच्या एका चिमुकल्याचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेमुळे कोलकात्यासह पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी लगेचच संपूर्ण परिसराचा ताबा घेतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास एका फळांच्या दुकानासमोर हा स्फोट झाला. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान एका मुलाचा मृत्यू झाला तर, गंभीर जखमी झालेल्या चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा स्फोट तीव्र क्षमतेचा होता, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नसून या स्फोटामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.