कोलकात्यात अमित शहा यांच्या रॅलीमध्ये तुफान राडा; दगडफेक करुन भाजपचे झेंडे, पोस्टर फाडले

0
561

कोलकाता, दि. १४ (पीसीबी) – भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीमध्ये आज (मंगळवार) भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. तसेच भाजपाचे पोस्टर आणि झेंडे तोडण्यात आले. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक देखील केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज अमित शहा यांची कोलकातमध्ये रॅली आणि सभा होती. शहा यांच्या सभास्थळी सभेआधीच बंगाल पोलिसांनी जात परवानगीचे कागदपत्र मागितले. मात्र, कागदपत्र देऊ न शकल्याने थेट सभामंडप तोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे भाजपाचे कार्यकर्ते सभा स्थळी जमले आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. यातच सायंकाळी अमित शहा यांचा रोड शो सुरु असताना भाजपच्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली. तसेच भाजपाचे पोस्टर, झेंडे तोडून टाकण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनीही तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केली.