Desh

कोलकाता पोलीस आयुक्तांनी सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर रहावे; सर्वोच्च न्यायालयाचा दणका  

By PCB Author

February 05, 2019

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – कोलकाता पोलीस आयुक्तांनी सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर रहावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने  कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना दिले असून त्यांनी तपासात सहकार्य करावे, असेही न्यायालयाने सांगितले आहे. तसेच सीबीआयने देखील राजीव कुमार यांना अटक करु नये, असे न्यायालयाने  स्पष्ट केले आहे.

चीट फंड गैरव्यवहारप्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांनाच तेथील पोलिसांनी गाडीत कोंबून पोलीस ठाण्यात आणल्याची घटना रविवारी घडली होती. लॉडन स्ट्रिटवर रंगलेल्या या नाटयमय घडामोडीला  ममता बॅनर्जी विरुद्ध केंद्र सरकार असे स्वरूप आले होते.

या प्रकरणावर आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.