“कोरोना हे तिसरं महायुद्ध, चीनी वस्तूंवर बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे”

0
464

मुंबई,दि‌.२१(पीसीबी) – कोरोना हे तिसरं महायुद्ध, चीनी वस्तूंवर बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे, असं रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

कोरोना’च्या प्रसाराचा जगाला धोका पोहोचू नये, यासाठीत चीनने कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळे चीनवर जगाने बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. चीनने कोरोना महामारीबद्दल जगाला अनभिज्ञ ठेऊन धोका दिला. कोरोना साथीचा संसर्ग जगभर वाढण्यास चीन जबाबदार आहे. चीनमधील आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण योग्य वेळी बंद करायला हवे होतं, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कोरोनाच्या प्रसाराचा जगाला धोका होऊ नये, याबाबत चीनने कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळे जगाने चीनवर बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे, असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच जगावर कोरोनाचं संकट लादण्यास सर्वथा चीन जबाबदार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनवर बहिष्कार घातला पाहिजे, असंही आठवलेंनी म्हटलंय.