Maharashtra

कोरोना संसर्गाचा मुकाबला करताना पोलिसांनी स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी – गृहमंत्री अनिल देशमुख

By PCB Author

April 05, 2020

 

मुंबई, दि.५ (पीसीबी) – मुंबई पोलिस आयुक्तालयात पोलिसांसाठी सुरक्षा साधन संचाचे (किट) आणि स्पेशल प्लास्टिक मास्क वाटप करण्यात आले. त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘राज्यातील पोलिस यंत्रणा या काळात आरोग्याचा धोका पत्कारुन १६-१६ तास कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. तसेच सरकार नेहमीच तुमच्या पाठीशी असेल, असा विश्वासही देशमुख यांनी पोलिसांना दिला.

संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. मात्र पोलिस आपले कर्तव्य बजावत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा मुकाबला करताना पोलिसांनी स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पोलीस दल अविरतपणे कार्यरत आहे, सदर काम करताना त्यांचा कोरोना रुग्णांशी व जनतेशी थेट संपर्क येत असल्याने त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांना आज विशेष मास्क, मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.#MaharashtraGovtCare pic.twitter.com/YPt88jSSyG

— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 4, 2020