Maharashtra

कोरोना विषाणुमुळे २७ मार्चला पासून सुरू होणाऱ्या १०० व्या नाट्य संमेलनावर पडदा

By PCB Author

March 13, 2020

मुंबई, दि.१३ (पीसीबी) – महाराष्ट्रातही उपाययोजना केल्या जात असून, अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यात आता २७ मार्चला पासून सुरू होणाऱ्या १०० व्या नाट्य संमेलनावर तात्पुरता पडदा टाकण्यात आला आहे. नाट्य संमेलन पुढे ढकलत असल्याची घोषणा नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आली.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुमुळे जनजीवन ठप्प व्हायची वेळ आली आहे. संसर्गजन्य आजार असलेल्या करोनामुळे गर्दी होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन रद्द करण्यात येत आहे. केंद्र सरकारने लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन देखील करण्यात आले.

करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे १०० वे महाराष्ट्रव्यापी नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आले आहे….#नाट्यसंमेलन१०० #natyasammelan100 @ashoknarkar4 @ratnakantjagtap @soumitrapote @KalpeshrajMT pic.twitter.com/12uirjDY5r

— अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (@NatyaParishad) March 13, 2020