कोरोना लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, शेतात तळे बांधून मत्सशेती केली अन्…

0
346

औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) : कोरोनाने होत्याचं नव्हतं केलं. कोरोना संसर्गाचा वेग मंदावण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लावलं. या काळात अनेकांचा रोजगार गेला. उच्चशिक्षितांच्या नोकऱ्या गेल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील दुधड गावातील उच्च शिक्षित तरुणांची लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्यानंतर थेट आपलं गाव गाठून मत्स्य शेतीला सुरुवात केली. अगदी एक वर्षापूर्वीच बेरोजगार झालेल्या या दोन्ही तरुणांनी मत्स्य शेतीच्या माध्यमातून 8 महिन्यात तब्बल 10 लाख रुपयांचं उत्पन्न कमावलं आहे.
नोकरी गेली, गाव गाठलं, मत्स्यशेतीला सुरुवात, लाखो कमावले

स्वतःच्या शेतात असलेल्या शेततळ्यात मत्स्यबीजे सोडून त्यांनी हे उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. साईनाथ चौधरी आणि सूरज राऊत अशी या दोन्ही तरुणांची नावे आहेत. लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्यानंतर निराश न होता त्यांनी नव्या उमेदीने मत्स्यशेतीच्या व्यवसायाला सुरवात केली आणि केवळ 8 महिन्यात जवळपास 10 लाखांचं उत्पन्न कमावलं.

तरुणांसमोर ठेवला आदर्श
एखादं संकट आल्यानंतर निराश न होता नव्या पर्यायांचा शोध घेऊन त्यादिशेने जाणं आणि यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन करुन मेहनत करणं, हाच यशाचा मूलमंत्र आहे, असं मत्स्य शेतीच्या माध्यमातून लाखो रुपये कमावणाऱ्या साईनाथ चौधरी आणि सूरज राऊत दाखवून दिलंय. साईनाथ आणि सूरज यांनी यामाध्यमातून तरुणांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.